महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील एकाकीपणाचा अभ्यास
Author : डॉ. गणेश प्रेमचंद वायकोस
Abstract :
आज सामाजिक माध्यमांद्वारे व्यक्ती ऑनलाईन जरी जोडला गेला असला तरी तोशारीरिकदृष्ट्या या सामाजिक माध्यमांच्या अतिवापरामुळे एकमेकांपासुन अलिप्तबनत चालला आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढत चाललेला सामाजिकमाध्यमांच्या वापर तरुण पिढीसाठी गंभीर समस्या बनली आहे. प्रस्तुत संशोधांनाचा उद्देश महाविद्यालयीनविद्यार्थ्यांमधीलएकाकीपणाचा अभ्यास करून एकाकीपणाच्या पातळीत लिंगभेद आढळतो आणि वास्तव्यानुसार एकाकीपणात फरक आढळतो का पाहणे हा आहे. प्रस्तुत संशोधांनासाठी परभणी शहरातीलवेगवेगळ्या वरिष्ठ महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांची निवड विस्कळीत पद्धतीनेकरण्यात आली. त्यातून २०० विद्यार्थी हे संशोधांनासाठी अंतिम स्वरुपात निवडण्यातआले. या २०० विद्यार्थ्यांमध्ये १०० मुले आणि १०० मुलींचा समावेश होता. तसेच १००विद्यार्थ्यांची निवड शहरी भागातून आणि १०० विद्यार्थ्यांची निवड ग्रामीण भागातूनकरण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधील एकाकीपणा शोधण्यासाठी डॉ. प्रवीण कुमारझा यांची Perceived Loneliness Scale ही प्रश्नावली वापरण्यात आली.मिळालेल्या प्रदत्ताचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी माध्यमान, प्रमाणविचलन आणि दोन समूहातील फरक तपासण्यासाठी t चाचणी चा वापर करण्यात आला.प्रदत्ताचे संख्याशास्त्रीय विश्लेषण असे दर्शविते की, मुलींपेक्षा मुलांमध्ये एकाकीपणाच्या पातळीचे प्रमाण अधिक दिसून आले आणि विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपेक्षा पेक्षा शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये एकाकीपणाच्या पातळीचे प्रमाण अधिक दिसून आले.
Keywords :
महाविद्यालयीन विद्यार्थी, एकाकीपणा, सामाजिक माध्यमे, लिंगभेद, शहरी आणि ग्रामीण वास्तव्य.