Download PDF

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील युवा समस्या

Author : डॉ. गणेश प्रेमचंद वायकोस

Abstract :

तारुण्यावस्था किंवा युवावस्थेच्या कालावधीत युवकांना अनेक समस्या आणि अडचणींना सामोरे जावे लागते. वैफल्य, चिंता, ताण, भावनिक बिघाड, विषमायोजित वर्तन अशा अनेक समस्या युवकांमध्ये या कालावधीत आढळतात असे संशोधकांना त्यांच्या अभ्यासात निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील युवा समस्यांमध्ये त्यांचे वास्तव्य, लिंग आणि शिक्षण शाखेनुसार फरक आढळतो का ते तपासणे असा होता. प्रस्तुत संशोधनासाठी परभणी शहरातील विविध महाविद्यालयात ‍शिक्षण घेत असेलेल्या १८ ते २५ वयोगटातील १६० विद्यार्थ्यांची अंतिम निवड करुन खालील प्रमाणे त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील युवा समस्यांचे मापन करण्यासाठी कु. संध्या शर्मा यांची युवा समस्या शोधिका (Youth Problem Inventory) (YPI) यांची चाचणी वापरण्यात आली. प्राप्त प्रदत्ताच्या विश्लेषणासाठी मध्यमान, प्रमाण विचलन आणि ‘टी’ चाचणी या सांख्यकीय पद्धतींचा वापर करण्यात आला. प्रस्तुत संशोधनात असे आढळून आले की, शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये युवा समस्यांच्या बाबतीत फरक आढळून आला. त्याचप्रमाणे मुले आणि मुलींमध्ये युवा समस्यांच्या बाबतीत फरक आढळून आला आणि कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्येदेखील युवा समस्यांच्या बाबतीत फरक आढळून आला.

Keywords :

युवा, युवा समस्या I