बुलडाणा व अकोला जिल्हयामधील फोटोग्राफी व्यवसायाचे व्यवस्थापकीय अध्ययन
Author : श्री. सतिश शालीग्राम हागे और डॉ. जयंत डी. पोरे
Abstract :
फोटोग्राफी हा सर्वांचा जिव्हाळयाचा विषय आहे I जुन्या काळामधे पेंटींगपासून आजच्या नविन तंत्रज्ञानाच्या युगामधे कॅमे-याच्या माध्यमातुन छायाचित्र टिपणे असा फोटोग्राफीचा खुप मोठा इतिहास आहे. या फोटोग्राफीच्या विविध पैलुंवर विविध देशांमधील खुप शास्त्रज्ञांनी संशोधने केली, अभ्यास केला ज्यामुळे आज फोटोग्राफी खुप जलद आणि सोपी अशी झाली I त्याचप्रमाणे सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी झाली I सुरुवातीला जुन्या काळामधे मोठमोठे राजे महाराजे त्यांच्या स्वतःच्या पेंटींग्स त्या काळामधील चित्रकार, कलाकार यांच्याकडुन काढुन घेत असत परंतु ते काम खुप खर्चिक आणि वेळखाउ पध्दतीचे होते तासनतास वाया जायचे परंतु त्याकाळामधे दुसरा कोणताही पर्याय नव्हता परंतु आज कालांतराने या संपुर्ण प्रक्रीयेमधे खुप मोठा बदल झपाटयाने होत गेला आणि आजची आधुनिक फोटोग्राफी अस्तित्वात आली I
आज कलेला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली परिणामी फोटोग्राफी क्षेत्र हे रोजगाराच्या खुप मोठया संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वाचे ठरले I प्रस्तुत शोधप्रबंधामधे फोटोग्राफी आणि फोटोग्राफरच्या ब-याच बाबींवर प्रकाश टाकलेला आहे ज्यामुळे या व्यवसायिकांच्या संधी आणि अडचणी पण समजुन येतात I बुलडाणा आणि अकोला जिल्हयामधे फोटोग्राफरची संख्या खुप मोठी आहे. बुलडाणा जिल्हयामधे एकुण 13 तालुक्यांमधे एकुण 590 फोटोग्राफी व्यवसायिक असुन अकोला जिल्हयातील 7 तालुक्यांमधे एकुण 540 फोटोग्राफी व्यवसायिक आहेत I
Keywords :
फोटोग्राफी, फोटोग्राफर, कॅमेरा आदि I