Download PDF

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील नांदेड जिल्ह‌याचा सह‌भाग

Author : मिलिंद पुंडलिकराव जाधव

Abstract :

भारताला स्वातंत्त्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिण्यांनी मराठवाड्‌याला स्वातंत्त्य मिळाले. मराठवाड पूर्वी हैद्राबाद संस्थानात होता. हैद्राबाद संस्थान हे भारतामध्ये विलिन होण्यास तयार नव्हते. ते स्वत:चे राष्ट्र निर्माण करू पाहत होते परंतू तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाने पोलीस ॲक्शन घेण्यात आली आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी ते भारतात विलीन झाले. 17 सप्टेबर 1948 ला मराठवाडा निजामाच्या गुलामीतून मोकळा झाला व स्वातंत्र्य मिळाले I
मराठवाडा मूक्तीसंग्राम या नावाने हा लढा ओळखला जातो. या लढ्‌यामध्ये अनेक चळवळी झाल्या, आंदोलने झाली, अनेक स्वातंत्र्यवीरांना आपले प्राण गमवावे लागले. निजाम व रझाकारांचे अत्याचार सहन करत गावागावात स्वातंत्र्याचे वारे पेटले होते I
मराठवाडयातीतील जनतेचे या लढ्यात खूप मोठे योगदान होते. या लेखात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील नांदेड जिल्ह‌याचा सह‌भाग या विषयी माहिती देण्यात आली आहे I

Keywords :

मराठवाडा, हैद्राबाद, निजाम, रजाकार I