निसर्ग व वारली चित्रातील समरूपता
Author : मिलिंद पुंडलिकराव जाधव
Abstract :
महाराष्ट्र राज्याच्या काही प्रदेशात विशेषतः ठाणे, पालघर जिल्हयाच्या भागात वारली आदिवासी जमात लहान लहान (वस्ती) पाडे करून राणावनात राहते. निसर्गाच्या सानिध्यात त्याचे वास्तव्य असल्यामुळे त्यांची निसर्गाशी जवळीकता निर्माण झाली. ते निसर्गाशी फार एकनिष्ठ राहतात. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ती सजीव असो वा निर्जिव, सूर्य चंद्र असो वा रानातला एखादा किटक सगळे वारली जमातीचे जीवलग. जीवनात पूर्णतः निसर्गाचा प्रभाव त्यामुळे शहरी संस्कृतीपासून आजही अनेक वारली लोक शहरापासून दुर आहेत. शेती, शिकार, मासेमारी, असे त्यांचे उद्योग आहेत. घरांच्या अर्थात सोपडीच्या कुडाच्या भिंतीवर मातीचा लेप देऊन त्यावर नैसर्गिक रंगाने चित्रे रेखाटने हे त्यांची संस्कृती. नैसर्गिक रंगापासून ते चित्रविषयापर्यंत सारे काही निसर्गाकडूनच घेतलेलं दिसून येते. त्यांच्या जगण्यात कृत्रिममपणा वा आधुनिकता नसतेच जणू. वारली चित्रकलेसह, त्यांचेसणसमारंभ, लग्नविधी, धार्मिक विधी यामध्येही निसर्गाचा प्रभाव असतो. निसर्ग व वारली चित्रातील समरूपता या लेखा मध्ये अभ्यासणार आहोत I
Keywords :
वारली कला, तारपा, आदिवासी I