Download PDF

उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या विज्ञान अध्ययन निष्पती साध्यतेसाठी प्रयोगांची सहाय्यता

Author : मिलिंद पुंडलिकराव जाधव

Abstract :

प्राथमिक व उच्चप्राथमिक शाळेत परिसर अभ्यास व सामान्य विज्ञान विषयातील पाठ्‌यांशाचे अध्ययन सुलभतेने व कृतियुक्त होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राज्यभरातील शाळेमध्ये विविध प्रकारचे विज्ञान साहित्य पुरविण्यात आले आहे I विशेषतः काही उच्चप्राथमिक शाळेमध्ये नाविण्यपूर्ण प्रयोगशाळा स्थापन झाल्या आहेत तर काही उर्वरीत शाळेमध्ये विज्ञान पेटी पुरवून अनेक विज्ञान साहित्याचा पुरवठा झाला आहे I विज्ञानातील विविध संकल्पना, संबोध या माध्यमातून स्पष्ट होत असतांना त्याही पलीकडे शाळा परिसरात उपलब्ध साहित्यातून पाठ्यांशासी पुरक असे प्रयोग करून विद्यार्थ्यांना विज्ञानातील अध्ययन निष्पती पर्यंत नेण्यासाठी केलेल्या कृतीकार्याची परिणामकारकता या संशोधन तपासली गेली आहे. यासाठी चला शिकूया प्रयोगातून विज्ञान हे संशोधन यासाठी सहाह्यभूत ठरला आहे I प्रात्यक्षिक कार्य व प्रयोग कार्यातून विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वाढते, मिळणारे ज्ञान चिरकाळ टिकते व अपेक्षित अध्ययन निष्पती साध्य होण्यासाठी कृतियुक्त शिक्षण महत्वाचे ठरते I

Keywords :

प्रयोगातून विज्ञान, प्राथमिक स्तर