Download PDF

ग्रंथालय आधुनुकीकरणातील व्यवस्थापकीय तंत्रे

Author : राहुल पितांबर जाधव और डॉ. योगिनी धाकड

Abstract :

मानवी जीवनामध्ये संप्रेषनास फार महत्त्व आहे. मनुष्य त्याचे ज्ञान अनुभव भावना अपेक्षा संप्रेषणाद्वारेच करत असतो. तिला हावभाव हात वारे आवाज इत्यादी मार्गाने मनुष्य संप्रेषण करत होता. लेखन कलेचा शोध लागला आणि संप्रेषणासाठी मनुष्य मातीच्या विटा दगड झाडाची साल पाने इत्यादींचा वापर करू लागला. कागद आणि मुद्रण तंत्राच्या शोधा नंतर मात्र संप्रेषण क्षेत्रात मोठीच क्रांती झाली. किती ज्ञान सहजपणे मुद्रित करून त्याचे जतन आणि संप्रेषण करणे सहज सुलभ झाले. अनेकांच्या अनेक प्रती छापने सहज शक्य झाले. संगणक युगामध्ये माहितीआणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आले आहेत. एवढेच नाही तर या पुढील काळामध्ये आणखी व्यापक परिणाम करणारे बदल घडून येणार आहेत यात शंकाच नाही. संगणक आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील विकासामुळे माहिती दूरच्या ठिकाणी वेगाने पाठविणे शक्य होत आहे. 24 तास उपलब्ध होत आहे. म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील विकासामुळे माहिती बहुमाध्यमे(Multimedia) काही उपलब्ध होत आहे. वाचक ग्रंथालीन सेवक व सेवा तसेच वाचन साहित्य इत्यादी सर्वच ग्रंथालयीन घटकांवर तंत्रज्ञानातील विकासाचे परिणाम होत आहेत. ग्रंथालय सुद्धा त्यांच्यामध्ये आधुनिकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वाढता वापर करत आहेत. ज्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या वापरातून ग्रंथालयाचे आधुनिकीकरण शक्य आहे त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय तत्वे आणि तंत्र यांच्या उपयोजनाद्वारेही ग्रंथालयांचे आधुनिकीकरण शक्य आहे

Keywords :

ग्रंथालय, आधुनिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञाना