माध्यमिक स्तरावरील विज्ञान व तंत्रज्ञान विषयाच्या अध्यापनात संकल्पना प्राप्ती प्रतिमानाच्या परिणामकारकतेचा अभ्यास
Author : डॉ. किरण एस खैरनार
Abstract :
माध्यमिक स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या विषयांपैकी विज्ञान हा विषय महत्त्वपूर्ण आहे. विज्ञानाने केलेले चमत्कार विलक्षण आणि अद्भुत आहे.विज्ञान शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे म्हणजे व्यक्तीमध्ये वैज्ञानिक वृत्ती रुजविणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणे हे होय.विज्ञान विषयाची व्याप्ती मोठी असल्या कारणाने विद्यार्थ्यांना प्रत्येक घटक व्यवस्थित रित्या लक्षात राहण्यासाठी संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा वापर केला तर अधिक फायदेशीर ठरेल. संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा वापर अध्यापनात केल्यास अध्यापन अधिक प्रभावी, परिणामकारक ठरेल याची जाणीव झाल्यामुळे प्रस्तुत संशोधन समस्येची निवड केलेली आहे. विज्ञान विषयातील विविध संकल्पना, नियम, तत्त्वे, सूत्रे विद्यार्थ्यांना संकल्पना प्राप्ती प्रतिमानाद्वारे शिकवल्यास अध्यापन प्रभावी होते
Keywords :
माध्यमिक स्तर, विज्ञान व तंत्रज्ञान, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, परिणामकारकता, अभ्यास