उच्च प्राथमिक स्तरावर मराठी विषयाच्या अध्यापनात नाटयीकरण पद्धतीच्या परिणामकारकतेचा अभ्यास
Author : प्रा.डॉ.पी.बी.वाघेरे और प्रा.डॉ. कैलास खोंडे
Abstract :
नाट्यीकरण हे अध्यापनाचे अतिशय प्रभावी असे साधन आहे. नाट्यीकरण माध्यमातून अध्यापन केल्याने मराठी विषयातील कठीण संकल्पनाही विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहतात यात शंका नाही, शिवाय नाट्यीकरण माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रसंगातील विविध पात्रानुसार अभिनय करावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पात्रातील किंवा एखाद्या प्रसंगातील गुणवैशिष्ट्येसुद्धा अविष्कृत होण्यास मदत होते, शिवाय विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेत रंजकता वाटू लागते म्हणून नाट्यकरण पद्धती ही मराठी विषयांमध्ये प्रभावी ठरत असल्याचे प्रस्तुत संशोधनांती लक्षात येते.
ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अभिनय करणे, अभिनयाचे निरीक्षण करणे अशा गोष्टी विशेष भावतात त्याच विचारांचा आधार घेऊन मराठी अध्यापनासाठी नाट्यीकरण पद्धती वापरली तर ती विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये अभिरुची वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते असा यापूर्वी केलेल्या संशोधनांचा सुद्धा आधार आहे मात्र हीच पद्धती आदिवासी भागातही उपयुक्त ठरते का तेही पाहणे रंजक होते म्हणून आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी नाट्यीकरण माध्यमातून ज्या बाबी प्रमाण भाषेतून ते शिकू शकत नाही त्याबाबी नाट्यीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी सोयीस्करपणे शिकतात हे या संशोधनातून सिद्ध होते, असे निष्कर्ष या शोधनिबंधात मांडलेले आहेत.प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या अध्यापनात नाटयीकरण पद्धतीचा वापर केल्याने होणाऱ्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केलेला आहे. व न्यादर्श म्हणून प्राथमिक मराठी केंद्रशाळा, खानवेल येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना संभाव्यतेवर आधारित लॉटरी पद्धतीने निवडले.प्रस्तुत शोधनिबंधात विद्यार्थ्याकडून प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून अर्थनिर्वचन करण्यात आले व त्या अनुषंगाने उद्दीष्टनिहाय निष्कर्ष मांडलेले आहेत. त्याचबरोबर काही सूचना व शिफारशी केलेल्या आहेत. तसेच या संशोधांनाला अनुसरून पुढील संशोधनासाठी काही नवीन विषयही सूचविलेले आहेत
Keywords :
उच्च प्राथमिक स्तर, मराठी विषय, अध्यापन, नाटयीकरण पद्धती, परिणामकारकता, अभ्यास